कुऱ्हाडीने वार करून पत्नीला पाठवले यमसदनी तर मुलीलाही केले घायल

0
 कुऱ्हाडीने वार करून पत्नीला पाठवले यमसदनी तर मुलीलाही केले घायल


अशोक खंडारे मुख्य संपादक

गडचिरोली:-
कोरची तालुक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीनारा येथे प्रितराम धकाते वय ५५ वर्षे याने सकाळी 11 वाजताच्या दरम्यान जंगलामध्ये लाकूड तोडण्याकरिता गेलेल्या आपल्या पत्नी रेखा धकाते वय 55 वर्ष आणि त्याची मुलगी शामबाई देवांगण व ३० वर्षे यांच्यावर कुऱ्हाडीने हमला केला. प्रितराम धकाते यांनी आपल्या पत्नीच्या डोक्यावरती वार केले. आपल्या आईच्या मदतीला रेखा धक्काते तिची मुलगी धावून आली असता प्रितराम धकाते याने तिच्यावर सुद्धा हमला केला त्यामुळे मुलीच्या हाताला दुखापत झाली आणि तिच्या हात तुटला व तिच्या पाठीवरती सुद्धा मार लागलेला आहे. मुलीने सावधगिरी दाखवून गावात जाऊन आपल्या पतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला लगेच मुलीच्या पतीने घटनास्थळावर जाऊन आपल्या सासूला दवाखान्यात भरती केले परंतु दुखापत जास्त असल्यामुळे तिच्या दवाखान्यात मृत्यू झाला आरोपी प्रीतराम धकाते हा कुटुंबातील व्यक्तींना नेहमी धमकी द्यायचा असे बोलले जात आहे. काही दिवसापूर्वी प्रीतराम धकाते हा आपल्या पत्नीला जिवानिशी मारण्याची धमकी सुद्धा दिल्याची माहिती आहे. घटनेच्या पुढील तपास कोरची पोलीस करीत आहेत

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !