देसाईगंज तालुक्यातील एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
अशोक खंडारे/ मुख्य संपादक
देसाईगंज:-
तालुक्यापासून पासून ८ किलोमिटर अंतरावर असलेल्या कुरुड येथे गळफास घेवून युवकाची आत्महत्या केल्याची घटना आज दि: २८ जुलै २०२३ ला घडली. गळफास घेतलेल्या युवकाचे नाव भोला देवराव साहरे (वय २३) सुभाष वॉर्ड कुरुड येथील रहिवाशी असे आहे.
सविस्तर वृत्तांत असे आहे की, भोला सहारे यांची आई धान रोवणी करायला बाहेर गावी गेली असल्याचे बोलले जात असून घरी कुणी नसल्याचा फायदा घेत राहत्या घरी गळफास घेत भोला याने जीवनयात्रा संपविली.
आत्महत्येचा करण्याचे कारण कळू शकले नाही.
भोला सहारे यांच्या पच्छात आई असून लहानगा परिवार असल्याने आईचा कर्ता मुलगा गेल्याने आईवर खुप मोठा दुःखाचं डोंगर कोसळला असून गावपरीसर शोकसागरात बुडालेला आहे. सामजिक कार्यकर्ते अविनाश गेडाम तसेच मनोज ढोरे, पो. पा. मडावी यांच्या नेतृत्वात सामजिक नैतिकतेचे भान ठेऊन व प्रशासनाच्या मदतीने पुढील उत्तरीय कार्य करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे शवविच्छेदनासाठी साठी मृतदेह नेण्यात आले.
घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन देसाईगंजचे अधिकारी कर्मचारी करीत आहेत.

