लॉयड्स मेटल्स तर्फे गुणवंतांना बक्षीस वितरण

0
लॉयड्स मेटल्स तर्फे गुणवंतांना बक्षीस वितरण


प्रमोद झरकर उपसंपादक

चामोर्शी:-
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून दिनांक 26.07.2023 ला लॉयड्स मेटल्स कंपनी कोनसरी कडून जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कोनसरी येथे गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कोनसरी येथील इयत्ता बारावीत प्रथम आलेली अंजली दशरथ पोतराजवार हीचा ३० हजार रोख व दहावीत प्रथम आलेली प्रांजल रामकृष्ण कावडे हीचा २५ हजार रोख तसेच शाल, गिफ्ट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोनसरी शाळेतून बारावीत प्रथम आल्यामुळे अंजली पोतराजवार या विद्यार्थिनीला पुढील पदवीच्या तीन वर्ष शिक्षणासाठी प्रतिवर्ष ३० हजार दिले जाणार आहेत. तर इयत्ता दहावीची प्रांजली कावडे हिला २५ हजार रुपये प्रतिवर्ष दोन वर्ष दिले जाणार आहेत.
प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या दोन्ही विद्यार्थीला लॉयड्स मेटल्स कंपनीच्या सामाजिक दायीत्व (CSR) विभागाच्या संचालक कीर्ती रेड्डी यांच्या हस्ते रोख रक्कम प्रदान करण्यात आले. यावेळी कर्नल महापात्रा (उपाध्यक्ष कॉर्पोरेट सर्विसेस) , सरपंच श्रीकांत पावडे, प्राचार्य दीपक शिवणकर, संजय पोतराजवार, राकेश दंडीकवार व इतर शिक्षकवृंद व समाजिक दायित्व विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !