रोडवर रोवणी करून ग्रामपंचायतचा केला ग्रामस्थांनी निषेध

0
रोडवर रोवणी करून ग्रामपंचायतचा केला ग्रामस्थांनी निषेध


प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता 19

आष्टी,
 चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली गट ग्रामपंचायत येथील सोमनपल्ली च्या महिलांनी गावातील रोडवर रोवणी करून ग्रामपंचायत चा निषेध करण्यात आला.

 सोमणपल्ली येथील ग्रामपंचायत ते शेंडे यांच्या घरापर्यंत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे तेव्हा ग्रामस्थांनी सरपंच निलकंठ निखाडे व ग्रामसेवक राकेश अलोणे  उपसरपंच निलेश मडावी यांना वारंवार माहिती दिली परंतू त्यांनी या बाबतीत लक्ष न देता सामान्य जनतेला वेठीस धरत आहेत व प्रत्येक कामासाठी चिखल तुडवत जावे लागत आहे .


 एवढे दिवस चिखल तुडवून झाले म्हणून धानाची रोपटे आणून महिलांनी त्या चिखलात रोवणी केली व खत सुद्धा टाकले असे अनोखे आंदोलन करुन त्यांनी पदाधिकारऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे या रोवणीचे काम ललीता मडावी ,दिक्षा कस्तूरे, शेवंता कस्तूरे, इंदिरा मोहुर्ले, सुनंदा कस्तूरे,बेबी कस्तूरे, संगीता आत्राम,अश्वीनी मोहुर्ले,रोशन कस्तूरे, सचिन गुडेकर,अमोल मोहुर्ले आदींनी केली 
अशा निगरगठ्ठ पदाधिकाऱ्यांनी आता तरी लक्ष देउन  त्या रोडची विल्हेवाट लावावी अशीही मागणी त्यांनी केली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !