हृदयविकाराच्या धक्क्याने नववीच्या विद्यार्थ्यीनीचा वर्गातच मृत्यू

0
हृदयविकाराच्या धक्क्याने नववीच्या विद्यार्थ्यीनीचा वर्गातच मृत्यू 


बीड :-
नवव्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी नियमितप्रमाणे शाळेत गेली, आपल्या समोरच्या बाकावर (Desk) बसली काही वेळातच तिने मान खाली टाकली शिक्षकांनी तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात घडली असून शेख रेश्मा असे नवव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. 
विद्यार्थिनीला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर यासंदर्भात शिक्षकांनी पालकाशी संपर्क साधला असता ते घटनास्थळी दाखल झाले.
त्यावर विद्यार्थिनी रेश्मा मागील काही
दिवसांपासून शाळा आणि ट्यूशन च्या
अभ्यासामुळे ताण येत असल्याचे पालकांना कळवल्याचे सांगितले, रात्री 1 वाजेपर्यंत ती अभ्यास  करीत होती आणि आज सकाळी शाळेत आली दरम्यान तणावामुळे लवकरच आम्ही शाळा बदलणार होतो परंतु तत्पूर्वीच असे भयावह घडले, असे हळहळ व्यक्त करीत पालकानी सांगितले.
हृदयविकाराच्या झटक्याचे मृत्यू चे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, चाळीशी नंतर हृदयविकाराचा झटका येणे स्वाभाविक झाले
परंतु शाळकरी वयात हृदयविकाराचा झटका ही चिंतेची बाब ठरत आहे, विद्यार्थ्यांवरील वाढता अभ्यासाचा ताण, स्पर्धेचे युग त्यामुळेच स्पर्धेत टिकायचे आहे, तर धावत राहा, अशी स्थिती सध्याच्या विद्यार्थ्यांची झालेली आहे. त्यातल्यात्यात खाजगी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या गृहपाठाचे ओझे विद्यार्थ्यांना न पेलणारे ठरत आहे आणि परत शिकवणी वर्ग  चा अभ्यास ? यामुळे पालकांनी तसेच शिक्षकवर्गानी विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अधिक भार लादू नये जो काही विद्यार्थ्यांना पेलणार नाही, तसेच शिक्षण विभागानेही शिक्षण पद्धती सौम्य करावी अशी मागणी समाजमनात अश्या माध्यमातून होत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !