येणापूर च्या बाजारात चिखलाचे साम्राज्य, जनतेला करावी लागते कसरत

0
येणापूर च्या बाजारात चिखलाचे साम्राज्य, जनतेला करावी लागते कसरत


बाजार लिलाव चार लाख रुपये खर्च मात्र किरकोळ

प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येणापूर च्या बाजारात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे जनतेला कसरती करून बाजारातील भाजीपाला खरेदी करावा लागतो आहे तरीपण ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सरपंच, उपसरपंच या बाबींवर कोनीही लक्ष देत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सदर बाजार आठवड्यातून बुधवारला भरविण्यात येत आहे
या बाजारात  परिसरातील येणापूर, चांदेश्वर, सगणापूर, रेशमीपूर, अड्याळ, किष्ठापूर, प्रियदर्शनी, वायगाव, लक्ष्मणपूर, दुर्गापूर, सोमणपल्ली, मुधोली, मुधोली चक नं दोन, हळदी, सेल्लूर, गणपूर, विठ्ठलपूर, राजगोपालपूर.  येथील ग्रामीण नागरिक येत असतात सदर बाजार लिलाव चार लाख रुपयाला एका कंत्राटदाराला देण्यात आला आहे परंतू ग्रामपंचायत कडून कोनतीही उपययोजना करण्यात आली नाही त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे 
 जनतेच्या माध्यमातून जर चार लाख रुपये उकळले जातात तेव्हा त्या बाजारक्षेत्रात चांगली व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी येणापूर, चांदेश्वर, सगणापूर,रेशमीपूर,अड्याळ,किष्ठापूर, प्रियदर्शनी, वायगाव,लक्ष्मणपूर,दुर्गापूर, सोमणपल्ली, सेल्लूर गणपूर, विठ्ठलपूर   आदी गावातील जनतेनी  केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !