सासवांच्या त्रासाला कंटाळून महिलेने राहत्या घरात गळफास लावून केली आत्महत्या
प्रमोद झरकर उपसंपादक
जळगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना रामेश्वर कॉलनीत घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. काजल गणेश राठोड असे मृत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवाशी राहुल चव्हाण याचा प्रेमविवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजलला आजे सासु सुग्राबाई चव्हाण, सासु मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचुन बोलत असत. तसेच तीचा छळ करत त्यामुळे नेहमी त्यांच्यात वाद सुरू होते. सतत होणाऱ्या भांडणामुळे राहुल चव्हाण हा १० जुलै रोजी काजल सोबत पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता. दरम्यान १३ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास तीने गळफास घेऊन आत्महत्या केली

