जिल्हा निर्मीतीच्या मागणी साठी नागभीडकरांचा कडकडीत बंद

0
जिल्हा निर्मीतीच्या मागणी साठी नागभीडकरांचा कडकडीत बंद, व मोर्चा 


अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी


नागभिड---- जिल्हा निर्मीती कृती समीती नागभीडच्या वतीने दिंनाक 10/7/2023 रोज सोमवार ला नागभीड बंदचे आयोजन करण्यात आले होते. शंभर टक्के नागभीडकरांनी बंद ठेवून नागभीड जील्हा निर्मीतीला पाठींबा दिला. राज्य प्रशासनाने प्रशासकीय सोयी साठी नविन जिल्हे निर्माण करण्याच्या बातम्या विविध प्रसार माध्यमातून प्रशिद्ध झालेल्या आहेत. या अनुसंगाने राज्य शासनाने चंद्रपुर जिल्ह्याचे विभाजन करुन नविन जिल्ह्याचा निर्माण करतांना सर्व सोयी युक्त नागभीड जिल्ह्याची निर्मीती करावी.



 तसेच चिमुर अप्पर जिल्हाधिकारी कार्यक्षेञातुन नागभीड तालुक्याला वगळण्यात यावे. या मागणीसाठी तहसील कार्यालय नागभीड येथे भव्य विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरवात प्रायमरी शिक्षक सोसायटी येथुन करण्यात येवून मुख्य मार्गाने काढण्यात. मोर्चात नागभीड जिल्हा झालाच पाहीजे, अभी नही तो कभी नही अशा विविध घोषणा देत मोर्चेकरी जात होते. या मोर्चात असंख्य महीला, पुरुष, तरुण सहभागी झाले होते. या मोर्चात बैलबंडी आकर्षण करीत होती. नागभीडकरांनी व तळोधी (बा) संपुर्ण बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या. फक्त औषधीचे दुकान सुरु होते. या मोर्चात खेड्या पाड्यातील नागरीक सुद्धा सहभागी झाले होते. अतिशय शिस्तपने मोर्चा जात होता. मोर्चा तहसील कार्यालयात पोहचताच मोर्चाचे रुंपातर सभे मध्ये करण्यात आहे. या प्रसंगी अनेकांनी मार्गदर्शन केले. त्यांनतर मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा मध्ये नागभिड तालुका मधील सर्व पक्षाचे पुरुष व महिला वर्ग, शेतकरी बांधव मोठ्या ऊत्साहाने उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !