खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसने राबविला अनोखं उपक्रम

0

खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसने राबविला अनोखं उपक्रम


'सुप्रिया सन्मान' नावाने महिलांचा केला सत्कार

राकॉचे विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

अहेरी:- 
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून अनोखं उपक्रम राबविण्यात आलं.राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून वाढदिवसानिमित्त कुठलेही आगाऊ खर्च न करता 'सुप्रिया सन्मान' म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये टेक्निशियन असलेल्या सरिता वाघ यांचा शॉल,श्रीफळ,पुष्पगुच्छ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम अहेरी विधानसभा महिला प्रमुख ज्ञान कुमारी कौशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार,जिल्हा उपाध्यक्ष आरती डुकरे,जिल्हा संघटक सचिव स्मिता निमसरकर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सरला मुडावार,जिल्हा सरचिटणीस जयश्री मडावी,जिल्हा चिटणीस गीता दुर्गे, संध्या मुरमाडे,जिल्हा सचिव मंगला गोबाडे, जिल्हा संघटन सचिव मंगलाताई मुरमाडे, नागेपल्ली शहर अध्यक्ष मायाताई सुनतकर,अहेरी शहर अध्यक्ष सुवर्णा पुसालवार,अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या कर्तुत्वाची छाप उंचावणाऱ्या संसदरत्न खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांचा ३० जून रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्यावर चहूबाजूने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.मात्र,त्यांनी वाढदिवसानिमित्त कुठलेही आगाऊ खर्च न करता महिलांचा सन्मान करण्याचे व गोरगरिबांना मदत तसेच गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते.

त्याचेच औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस कडून अहेरी येथे विविध उपक्रम घेऊन 'सुप्रिया सन्मान' या नावाने महिलांचा सत्कार करण्याचा उपक्रम राबविला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !