पत्नीचा खुन करणा-या पतीला आजन्म कारावास
सपोनी नितेश गोहणे यांच्या तपासात गुन्हा निश्पन्न
नागपूर:-
चारित्रावरील संशयारून पत्नीचा गळा दाबुन खुन करणा-या पतीला दि. २०/०६/२०२३ रोजी सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महीना अतिरिक्त कारावास आणि पुरावे नष्ट केले म्हणुन तीन वर्षे कारावास व एक हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महीना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. जग्गु सनक धुर्वे वय ४५ वर्षे असे आरोपीचे नाव असुन मृतक पत्नी नामे ममता जग्गु धुर्वे आहे. ते मौजा ईटगाव, ता पारशिवनी जि. नागपुर येथे राहत होते. पत्नी दुस-या व्यक्तीसोबत बोलते है पतीला आवडत नव्हते. दि. १७/०८/२०२० रोजी यातील आरोपी याने पत्नीच्या चारीत्रावर संशय घेवुन रात्री १०/०० वा. दरम्यान पत्नीचा गळा, नाक व तोंड दाबुन खुन केला.. सदर बाबत पो. स्टे. पारशिवनी येथे दि. १८/०८/२०२० रोजी अप. क. २२३ / २०२० कलम ३०२,२०१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक नितेश गोहणे यांनी सदर गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करून सबळ पुरावे मिळुन आल्याने आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दाषारोपत्र दाखल केले. तांत्रिक पुरावे, फिर्यादी व ईतर साक्षीदार यांचे बयाण तपासी अधिकारी यांची साक्ष तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. सत्र न्यायालयाने आरोपी जग्गु सनक धुर्वे यास आजन्म कारावास व एक हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महीना अतिरिक्त कारावास तसेच पुरावे नष्ट केले म्हणुन तीन वर्षे कारावास व एक हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास एक महीना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. दिपाली गणगणे यांनी कामकाज पाहीले. तसेच गुन्हयाचा तपास सपोनि नितेश गोहणे पो स्टे पारशिवनी यांनी केला. तसेच सदर प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व अमलदार यांनी खटल्याच्या कामकाजात महत्वाची भुमीका पार पाडली.

