शालेय विद्यार्थिला भर रस्त्यातून उचलून नेऊन केला बलात्कार
प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता
भिवापूर:-
इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणीला भर रस्त्यावरून उचलून घरामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मात्र तरुणीने आपली कशीबशी सुटका करून घडलेल्या प्रकार आपल्या पालकांना सांगितला ही घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर मध्ये घडली या प्रकरणी आरोपी सागर जनार्दन राऊत वय 22 वर्षे याला पोलिसांनी अटक केली आहे पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार पीडित १६ वर्षे तरुणी इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असून तरुणीचे आई-वडील शेतमजूर म्हणून काम करतात. आरोपी सागर राऊत यांची तरुणी वरती सुरुवातीपासून वाईट नजर होती. सागर राऊत हा नेहमी तरुणीच्या मागावर असायचा अधून मधून तिला जातीवाचक शिवीगाळ सुद्धा करायचा तरुणीने सागर राऊत याची आपल्या आई-वडिलाकडे तक्रार सुद्धा केली होती. आणि आई-वडिलांनी त्याची समजून सुद्धा काढलेली होती मात्र सागर राऊत याच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही. उलट जास्त त्रास देणे सुरू केले मात्र तरुणीने त्याला नकार देताच 26 जूनला दुपारी बारा वाजता तरुणी वस्तीतील लोक शेतावर गेल्यानंतर मुलगी आजीला बोलवायला शेतावर जात असता त्यावेळी सागर राऊत याने तरुणीला रस्त्यावरून उचलून घरी नेले आणि तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिला घरात डांबून ठेवले मात्र तरुणीने समय सुचकता दाखवीत घराच्या खिडकीतून उडीत घेऊन आपली कशीबशी सुटका करून सायंकाळी घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. लगेच आई-वडिलांनी भिवापूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली तक्रार नोंदवल्यानंतर भिवापूर पोलिसांनी आरोपी सागर राऊत याला तातडीने अटक करून गुन्हा दाखल केला पुढील तपास भिवापूर पोलीस करीत आहेत

