दुचाकी व कार च्या अपघातात दुचाकीस्वार इसम गंभीर
अशोक खंडारे मुख्य संपादक
गोंडपिपरी:-
गोंडपिपरी येथील तहसील कार्यालया समोर दुचाकी व कारचा अपघात होऊन एक इसम गंभीर झाल्याची घटना आज २५ मे ला सायंकाळच्या 6.30 वा. चे सुमारास घडली.
MH 34 B 8341 हि कार गोंडपिपरी तहसील कार्यालयातून शहरा कडे जात असताना कारचालकाने एकदम ब्रेक मारल्याने चंद्रपूर कडून येणारी दुचाकी क्र MH 34 AE 3059 ही कारला धडकली दुचाकीस्वार खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला आहे.अपघात होताच कारचालकाने धुम ठोकली व पळून गेला दुचाकीस्वार इसमास गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमीचे नाव कळू शकले नाही.

