जिद्द,चिकाटी व मेहनत यांच्या जोरावरती यश संपादन करता येते - डी. के. साखरे
अशोक खंडारे मुख्य संपादक
डोंगरगाव (ता. मंगळवेढा )-: शिक्षण हे वाघिणीचे दूध असून जिद्द. चिकाटी व मेहनत यांच्या जोरावरती यश संपादन करता येते असे प्रतिपादन रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते डी. के. साखरे यांनी केले. मौजे मरवडे येथील समाधान विलास कांबळे यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्या बद्दल डोंगरगाव येथे सरपंच सारिका विवेक खिलारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी साखरे बोलत होते.
यावेळी बोलताना साखरे म्हणाले की ज्यांचे आई वडील मोल मजुरी करून दुसऱ्याच्यात सालगडी म्हणून काम करून आपला मुलगा समाधान यास शिक्षणाबरोबर चांगले संस्कार दिले आणि समाधान कांबळे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले ते वाखाणण्याजोगे असून. समाधान कांबळे यांचा आदर्श सर्व तरुणांनी घेतला पाहिजे. यावेळी सरपंच सारिका खिलारे यांनीही आपल्या मनोगतातून डोंगरगाव ग्रामस्थांच्या वतीने कांबळे यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून शुभेच्छा दिल्या. तर सत्काराला उत्तर देताना समाधान कांबळे म्हणाले की ; मला परिस्थितीची जाण असून डोंगरगावच्या गावकऱ्यांनी केलेला सत्कार माझ्या कायम स्मरणात राहील.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबा सय्यद, अमोल मेटकरी,दादा खिलारे,सिद्धेश्वर भोसले,समाधान भोसले,पोपट भोसले, सागर भोसले, वैशाली चंदनशिवे, सिदू झेंडे यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

