रिपब्लिकन पक्षाचे आम्ही म्हणतो १७ गट ,"मग भारतीय बौद्ध महासभेचे किती ? गटातटातील वास्तव काय? माजी गटविकास अधिकारी - बाळकृष्ण बांबोळे.
प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
गडचिरोली:-
राजकारणात रिपब्लिकन पार्टी गटा तटात विभागल्या गेली आहे. ते कधीच एकत्र येत नाही.पण आपण अलीकडे बघतो की भारतीय बौद्ध महासभेचेही १७ गट आहेत की काय ? आणि यातही खरा गट कोणता ? आणि त्यांचा उद्देश काय असा प्रश्न अनेकाला पडला आहे. तेव्हा आम्ही भारतिय बौध्द महासभेतील कार्यकारणीचे सदस्य असुन सुद्धा खरा गट कोणता सांगावा मिराताई..., पाटिलचा की राजरत्न आंबेडकरांचा? वा दुसरा आणखी?. म्हणून कार्यकर्ते म्हणतात कोणता झेंडा घेऊ हाती? ज्याच्याकडे रजिस्ट्रेशन आहे मी त्याच्याकडे आहे. म्हणुन मी धम्माचे कार्य करीत आहे. मला जागतिक लेवलची बॅक नको. राऊत बोरकर एकत्र येत आहेत.
मग भारतीय बौद्ध महासभेच्या तथाकथीत धम्माचा प्रचार करणाऱ्यांनी सुद्धा एकच बौद्ध महासभा ठेवावी.अन्याथा "भीम के लक्ते जिगर, आधे इंदर आधे उदर, अशी पाळी यायला नको अशा प्रकारचे मार्गदर्शन माजी बिडिओ तथा भारतीय बौद्ध महासभेचे गडचिरोली शाखा प्रमुख बाळकृष्ण बांबोळे यांनी महादवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी केले.
गडचिरोली तालुक्यातील महादवाडी येथे तथागत बुद्ध मुर्तीचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
याचबरोबर बुध्द विहाराच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी अभारिपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत हे अध्यक्षस्थानी होते. तर उदघाटक म्हणुन अभारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण खोब्रागडे हे लाभले होते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टीचे
जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर, प्रा. दिलीप बारसागडे , भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष तुलाराम राऊत, जर्नाधन ताकसांडे, प्रा. प्रकाश दुधे, हंसराज उंदिरवाडे, रामनाथ खोब्रागडे, भिमराव शेंन्डे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मुनिश्वर बोरकर म्हणाले की RPI १७ पक्षात असला तरी आमचा एक आमदार खासदार बिजेपी कांग्रेसच्या शंभर आमदारा बरोबर आहे.
परंतु अलीकडे भारतीय बौद्ध महासभेत ज्यांनाआतापर्यत कुणी विचारत नव्हते
असी माणसे धम्म सांगत धोपटी धरून फिरताना दिसतात. त्यांच्यावर अन्याय झाला तर RPI धाऊन जातो हेहि विसरता कामा नये. उदाहरण द्यायचे झाल्यास सिरोंचा कार्यक्रम डोळ्यासमोर येतोय.याप्रसंगी कार्यक्रमाने अध्यक्ष रोहिदास राऊत यांनी
बौद्ध धम्मा विषयी व राजकारणाविषयी विश्रुत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामनाथ खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमास सदर परिसरातील बहुसंख्य नागरिक
उपस्थित होते.

