प्रेम प्रकरणातून केलेली मारहाण खुनात परावर्तित. पोलिसांचा अंदाज

0
प्रेम प्रकरणातून केलेली मारहाण खुनात परावर्तित. पोलिसांचा अंदाज 



अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता

वरोरा:-
चंद्रपूर जिल्ह्यात खून हल्ले आता नित्याचीच बाब ठरत असून सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. नुकताच चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर मूल तेथे झालेला गोळीबार बघता अगोदरच पोलिसांची तारांबळ उडाली असतांना व त्या आरोपींचा शोध सुरू असतांना वरोरा येथील विकास नगर येथे 20 मे शनिवार रोजी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
रितेश लोहकरे राहणार विकास नगर असे मृतक युवकांचे नाव असून, हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. घटनेच्या दिवशी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास त्याला एका मित्राने फोन करून त्याच्या घरा जवळील पान शॉवर बोलावले. तिथे काही तरुण आधीच रितेशची वाट बघत होते. रितेश आणि त्या तरुणांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान त्यांनी रितेशवर काठीने हल्ला चढवला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !