प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
गडचिरोली:-
नगर परिषद गडचिरोली अंतर्गत बाजारातील गाळे चा लिलाव काढण्यात आला असुन त्यापैकी ५% गाळे अपंगाना राखीव ठेवून अपंग व्यक्तींना घ्यावे अशी मागणी दिव्यांग व्यक्ती मुकुंदराव उंदिरवाडे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली यांना निवेदनाद्वारे केली. अंपग व्यक्ती अधिकार अधिनियम कायदा २०१६ कलम ३७ (क) अन्वये ५% सवलतीचा दरात देण्याची तरतूद आहे. जमीन गृह निर्माण योजना आसरा धंदा ग्रामपंचायत, पंचायत समिती मधे 3% टक्के रक्कम अपंगांसाठी खर्च करावे उपक्रम करमणूक केंद्र, अश्या विविध योजनासाठी अपंगांना सहकार्य करावे. संध्या नगर परिषद गडचिरोली हद्दीतील बाजारातील गाळ्याचा लिलाव होत आहे. तेव्हा अंपगाना ५% टक्के गाळे राखीव ठेवून सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी नप प्रशासनाकडे अंपग व्यकी मुंकुदराव उंदिरवाडे यानी केली आहे. अपंगाचे अर्ज स्विकारून गाळे उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा मुंकुदराव उंदिरवाडे यांनी दिला आहे

