अशोक खंडारे मुख्य संपादक
चंद्रपूर : जुन्या सिनेमात कानून के हाथ बड़े लंबे होते है.. हा डायलॉग हमखास असायचा. मात्र चंद्रपूरात घडलेल्या एका घटनेने कानून के हात छोटे हो गये, असं म्हणण्याची वेळ आली आहे. चंद्रपूर (Chandrapur Women Police) शहरात एका महिला पोलीसाला काहीनी शिव्या दिल्यात, तिचा अपमान केला. तिने थेट पोलीस गाठले. मात्र पोलीसांनी तिची तक्रार स्वीकारली नाही. उलट ज्याने अपमान केला. त्याला माफी मागण्यास वरिष्टानी सांगितलं. समाज माध्यमात या प्रकाराची चर्चा सुरु आहे. पोलिसांनाच न्याय मिळत नसेल तिथे सामान्यांनी न्यायाची अपेक्षा कशी करावी? असे प्रश्न नेटकरी उपस्थित केले जात आहेत. दरम्यान पोलीस निरीक्षकांशी (Police Inspector) भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
महिला पोलिसाचा दुचाकीला एका कारने धडक दिली होती. धडक दिल्यानंतर माफी मागण्याऐवजी धडक देणाऱ्याने महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली होती. भररस्त्यात या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अपमान करण्यात आला. या महिलेला परक्यांकडून जो अमपान सहन करावा लागला त्यापेक्षा जास्त अपमान ती ज्या पोलीस ठाण्यात कामाला आहे तिथल्या
सहकाऱ्यांकडून झाला. आपल्यासोबत झालेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी ही महिला पोलीस कर्मचारी ज्या पोलीस ठाण्यात ती कामाला आहे त्या पोलीस ठाण्यात गेली होती. यावेळई तिची तक्रार दाखल करून घेतली नाहीच उलट तिला शिवीगाळ करणाऱ्याची माफी माग असं सांगण्यात आल्याची चर्चा आहे. ज्या व्यक्तीने महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली ती व्यक्ती जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा खासम खास आहे. या नेत्याने आणि शिवीगाळ करणाऱ्याने पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून गुन्हा दाखल होऊ देऊ नका यासाठी दबाव आणल्याचा बोललं जात आहे. या दबावाला पोलीस बळी पडलेत, अश्या चर्चा समाजमाध्यमात रंगल्या आहेत.
राज्याचं गृहखातं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आहे. फडणवीस ज्या विदर्भातले आहे, त्या विदर्भात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची ती काम करत असलेल्या पोलीस ठाण्यातच तक्रार घेतली जात नसेल तिथे सर्वसामान्य माणसाच्या तक्रारीचे काय? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

