एकाच तालुक्यात दोन गावातील ईसमांची गळफास घेऊन आत्महत्या

0
एकाच  तालुक्यात दोन गावातील ईसमांची गळफास घेऊन आत्महत्या 



अशोक खंडारे मुख्य संपादक

ब्रम्हपुरी:-
 ब्रम्हपूरी तालुक्यातील धानोली पोहाचक येथील एका 42 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 
दिनांक 19 मे 2023 रोजी दुपारी 11 वाजताच्या दरम्यान घडली.
किसन पटवारी बनकर वय (42) वर्ष राहणार धानोली पोहा चक असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मृतक इसमाचे नाव आहे
तर चौगान येथील धनपाल राऊत यानेही याच दिवशी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
 किसन याला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन जळले होते
त्यामुळे तो नेहमी नशेतच असायचा.काही दिवसा अगोदर तो बाहेरगावी कामाला गेला होता. व एक दोन दिवसानंतर तो गावी परतला होता. त्यामुळे त्याचे व्यसन अधिक वाढले होते. त्यातच त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे

तसेच तालुक्यातील चौगान येथील धनपाल श्रावण राऊत वय 40 वर्ष या इसमाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दिनांक 19 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली.
प्राप्त माहितीनुसार धनपाल यांचे दहा वर्षा अगोदर लग्न
झाले होते. याला दारूचे व्यसन होते. व दारू पिल्यानंतर पत्नीसोबत नेहमी तो भांडण करायचा. त्यामुळे मृतक धनपालची पत्नी आपल्या दोन्ही मुलाला घेऊन माहेरी निघून गेली होती. त्यामुळे नैराश्यात येऊन त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !