विवाहीत तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..... कौटुंबीक कलहाची किनार.....

0
  विवाहीत तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या..... कौटुंबीक कलहाची किनार.....


प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक 
राजूरा:-
राजुरा तालुक्यातील साखरवाही येथील चौकातील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन विवाहित तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 11) मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव नरेश नामदेव बोरकुटे (वय 35) असे आहे. मृतक नरेश व त्याची पत्नी एक महिना वरूर रोड येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होते. घरी पती पत्नीचे भांडण होत होते. मृतकाच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी माझा मुलगा व पती गायब असल्याची तक्रार पोलीसांना दिली. त्यानंतर ती गावाला निघून गेली. मृतक नरेश बोरकुटे हा ट्रक्टर चालवायचा पत्नी गावाला गेल्याने तो आपल्या गावी साखरवाही येथे परत आला. गुरुवारी 1.30 च्या मध्यरात्री विहिरीत ऊडी घेऊन त्याने आत्महत्या केली. विहिरीच्या जवळपास गावातील देवराव रासेकर हे झोपून होते. विहीरीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने तो उठला. त्यांने लगेचच त्यांचा घरी जाऊन मृतक नरेशने विहीरित उडी घेतल्याची माहिती दिली. सदर घटनेची माहीती राजुरा पोलीसांना कळताच सकाळी 11 वाजता पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतकाचा प्रेत विहिरीतून बाहेर काढण्यात आला. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे पाठविण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहे.ण

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !