धर्मप्रकाश कुकुडकर यांच्या प्रयत्नामुळे मृत मुलीच्या आईला दोन लाखांची मदत

0
धर्मप्रकाश कुकुडकर यांच्या प्रयत्नामुळे मृत मुलीच्या आईला दोन लाखांची मदत


अशोक खंडारे मुख्य संपादक
आष्टी:-
  एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड येथील लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने आष्टीच्या चंद्रपूर मार्गावरील वन विभागाच्या तपासणी नाक्यासमोर १२ वर्षीय सोनाक्षी मसराम या मुलीचा १४ मे रोजी बळी घेतला होता. सोनाक्षीच्या मृत्यूने तिची आई पार खचून गेली होती. घरची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची आहे. अशा स्थितीत तिला मदतीची आवश्यकता होती. ही बाब जाणून माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर यानी प्रयत्न करीत संबंधित ट्रक मालकाकडून सोनाक्षीची आई दुर्गा मसराम यांना दोन लाख रुपयांची मदत मिळवून दिली .
सोनाक्षी ही आपल्या आईसोबत
भाड्याच्या घरात राहात होती. मुलीच्या अपघाती निधनाने दुर्गा यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला
होता. आर्थिक मदतीसाठी ती याचना करीत होती. अखेर जि.प. चे माजी सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर यांनी
तिला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ट्रक मालकाला तिच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर मानवतेच्या दृष्टीने तिला आर्थिक मदत करण्याची विनंती केली. शेवटी ट्रक मालक यांनी दोन लाख रुपयांची मदत देण्याची तयारी दर्शविली. मंगळवारी तिला आष्टी येथे दोन लाखाचा चेक देण्यात आला तसेच २० हजार रुपये रोकड देण्यात आली. याप्रसंगी माजी जि.प.सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, आष्टी ग्रा.पं.चे उपसरपंच सत्यशील डोर्लीकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष मेश्राम, सत्यवान शेडमाके, मृत मुलीची आई दुर्गा मसराम व कंपनीचे पदाधिकारी खडसे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !