स्वतःच्या पोटच्या मुलीवर वडिलाने केला अत्याचार, पोलिसात गुन्हा दाखल

0
स्वतःच्या पोटच्या मुलीवर वडिलाने केला अत्याचार,  पोलिसात गुन्हा दाखल



अशोक खंडारे मुख्य संपादक

रावेर :-
दि. २१ जन्मदात्या बापानेच आपल्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना रावेर तालुक्यातील चिनावल येथे घडली.

रावेर तालुक्यातील चिनावल येथील १३ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह राहत होती दि २१ मे रोजी मुलीची आई नेहमीप्रमाणे सकाळी कामावर निघून गेली असता सकाळीच ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास मुलगी घरात भांडी घासत असतांना जन्मदात्या बापाने मुलीस बळजबरीने ओढून घरात नेत मुलीवर अत्याचार केला. पिडीत मुलीने आरडा-ओरडा केल्यानंतर शेजारऱ्यांनी घरात धाव घेत पिडीत मुलीची नराधम बापापासून सुटका केली. व त्याला चोप सुद्धा दिला. या वेळी नराधम बापाने घटनास्थळावरून पळ काढला. नराधम बाप फरार असून या प्रकरणी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून सावदा पोलिस स्टेशनला नराधम बापाविरुद्ध पोस्को सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !