अथर्व अम्मावार आष्टी केंद्रातून प्रथम

0
अथर्व अम्मावार आष्टी केंद्रातून प्रथम


अशोक खंडारे मुख्य संपादक

आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील अथर्व मल्ला अम्मावार हा आष्टी केंद्रातून प्रथम आला आहे.
अथर्व हा सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय आष्टी येथील विघार्थी आहे एच एस सी परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून त्याला ७९.६७ % गुण मिळाले आहेत
अथर्व हा स्वतः अंगमेहनतीचे कामे, वडिलांच्या धंद्यात मदत तथा स्वतःच्या शेळ्या, मेंढ्या ची राखन करीत करीत वेळात वेळ काढून अभ्यासाकडेही लक्ष देत होता त्याने मनाशी जिद्द केली होती की आपण चांगले गुण मिळवून उत्तीर्ण व्हावे आणि त्याला यश प्राप्त झाले.
त्याने आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व आई वडिलांना दिले आहे 
या होतकरू विद्यार्थ्यांचे गावात खूप कौतुक होत आहे व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !