वडिलास मृत्यूने घेतले होते कवेत, मुलगा शांत कसा राहील . पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर

0
 वडिलास मृत्यूने  घेतले होते कवेत,   मुलगा शांत कसा राहील .
पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर



प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक

सावली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील सोनापूर येथील शेतकरी तेजरावजी भुरसे यांचे शेतात पाणी करत असतानाच त्यांना विजेचा करंट लागल्याने ते होरपळत असतांना बाजूला असलेला मुलगा ही आपल्या वडीलाला वाचविण्यासाठी धावला आणि तोही गंभीर जखमी झाला आहे.
यात शेतकरी तेजराव भुरसे यांचे निधन झाले तर त्यांच्या मुलगा दिनेश भुरसे हे देखील गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. त्यांनतर पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !