प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
आष्टी :-
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या गुंडापल्ली गावात एका नवविवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना, मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. हसिना दुधकुंवर (22) असे मृतक नवविवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे, 1 महिन्यापूर्वीच तिचे लग्न झाले होते, अशातच तिने आत्महत्या केल्याने गावात खळबळ निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुंडापल्ली येथील रहिवासी असलेल्या हसिनाचा विवाह 1 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील उंदिरगाव येथील स्वप्निल दुधकुंवर नामक युवकाशी झाला होता. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या पतीसोबत
माहेरी गुंडापल्ली येथे आली होती. दरम्यान दोघेही पती-पत्नी कुटुंबीयाच्या विवाह समारंभात जाणार होते. मात्र शेत मंगळवारी सकाळच्या सुमारास मि हसिनाने शौचास जात असल्याचे आ सांगित गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती प्राप्त होताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. आष्टी पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळ गाठत पंचनामा करण्यात आला. अधिक तपास आष्टी पोलिस करीत आहेत

