चेंजींग रुममधील महीलांचे चित्रीकरण करणाऱ्या जि.प. शिक्षकास अटक

0
चेंजींग रुममधील महीलांचे चित्रीकरण करणाऱ्या जि.प. शिक्षकास अटक


  सुज्ञ महिलेच्या तक्रारीवरून झाली कारवाई


प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक

देसाईगंज :-
चेंजिंग रूम ला छिद्र पाडून कपडे बदलणाऱ्या महिलांचे मोबाईलने चित्रीकरण एक शिक्षक करीत असल्याचा प्रकार देसाईगंज (Desaiganj Gadchiroli) येथे उघडकीस आला असून त्या शिक्षकास एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अटक केली आहे .
नंदकिशोर भाऊराव धोटे (45) रा. कुरखेडा, ह.मु. देसाईगंज असे त्या शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो कुरखडा तालुक्यातील एका जि.प.शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर तो देसाईगंज येथे वास्तव्यास राहत असून स्वतःच्या घरी त्याची पत्नी शिवणकाम करते. त्यामुळे पत्नीकडे शिवणकाम करण्याकरिता महिलांची रेलचेल असते. कपडे बद्दलण्याकरिता छोटी खोली करण्यात आली असून या खोलीच्या भिंतीला छोटे छोटे छिद्र पाडून शिक्षक नंदकुमार धोटे हा मोबाईलद्वारे महिलांचे कपडे बद्दलतानाचे चित्रीकरण करत असे. सदर बाब एका महिलेला लक्षात येताच देसाईगंज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असता नंदकिशोर धोटेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले व 15 मे रोजी न्यायालयात हजर केल्याचे कळते. शिक्षकाच्या या कृत्याने मात्र जिल्हाभरात शिक्षण क्षेत्रात एकचं खळबळ उडाली असून पुढे काय कार्यवाही होते याकडे जिल्हा वासीयांचे लक्ष लागले आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !