पोलिसांची कारवाई, १० लाख
४४ हजार चा मुद्देमाल जप्त..
अशोक खंडारे मुख्य संपादक
सावली, १० मे :-
मध्यरात्री दरम्यान
मुल ते गडचिरोली मार्गावरून चारचाकी वाहनाने अवैध दारू वाहतूक होणार आहे अशा मिळालेल्या गोपनीय खबरेवरून पोलिस स्टेशन सावली समोर तात्काळ नाकाबंदी केली असता फोर्ड EcoSport MH 27AR 9531 मध्ये रॉकेट संत्रा देशी दारू कंपनी चे 44 बॉक्स मिळून आले...
मिळून आलेली नमूद क्रमांकाची कार किंमत 8 लाख रु व देशी दारू 44 बॉक्स किंमत 2 लाख 14 हजार रुपये असा एकूण 10 लाख 14 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तीन आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी
कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात
आला.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी , अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू व उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांचे
मार्गदशनाखाली व ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पो उपनी मडावी, स. फौ. खरकाते, पो का धीरज, निलेश ,महिला अंमलदार विशाखा यांनी केली.

