प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
गोंडपिपरी आष्टि मार्गावर विठ्ठलवाडा बस स्टैंडजवळ झालेल्या भीषण अपघातात लगाम बोरी येथील ३५ वर्षीय ट्रक चालक ठार झाल्याची घटना आज बुधवारला रात्रौ 2 वाजताच्या सुमारास घडली आहे. चालकाला झोप लागल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला उतरली आणि उभ्या असलेल्या एका खाजगी हायवा ट्रकला जाऊन धडकली. चालकाचे डोके गाडीच्या बाहेर निघून असल्यामुळे
डोक्याला जबर मार बसला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला..
सदर ट्रक वाहनाचा क्रमांक एम एच ३३ टी १८८२ आहे.
आर के ट्रेडर्स ट्रान्सपोर्ट गडचिरोलीच्या मालकीची असलेले ट्रक वाहन गडचीरोली जिल्हातून लाकडे भरून बल्लारपूरकडे येत असताना अचानक ट्रक चालकाला झोप लागल्याने रस्त्यावरील उभ्या वाहनाला ट्रक धडकली चालकाची डोक्यावरील कवटीच उडाली. त्यामुळे ट्रक चालक जागीच ठार
झाल्याची घटना विठ्ठलवाडा बसस्थानका समोरील रस्त्यावर घडली आहे. मृतकाचे नाव अमिद शेख वय ३५ असे असून राजपुर बोरी ता. अहेरी येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे.

