प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता
मुल: दारूच्या नशेत पित्याने पोटच्या अवघ्या तीन वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतःवर चाकूने सपासप वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची दुर्देवी घटना रविवारी पहाटे पाच वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील राजोली या गावात उघडकीस आली.
मृत बालकांचे नाव प्रियांशु गणेश चौधरी (३) तर पित्याचे नाव गणेश विठ्ठल चौधरी (३१) असे आहे.
मूल तालुक्यातील राजोली येथील गणेश विठ्ठल चौधरी हा आपल्या पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता, हनुमान जन्मोत्सव दिवशी गणेश दारू पिऊन घरी आला व पत्नीला बेदम मारहाण केली. पतीच्या मारहाणीला घाबरून पत्नी घराबाहेर पळाली , घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहत होते.
दरम्यान, रविवारी पहाटे ५:३० वाजताचे दरम्यान त्याने दारूच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबून खून केला, आणि स्वतःच्या गळ्यावर चाकुने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावर मूल पोलीस पोहचून पंचनामा केला असून जखमी गणेश चौधरी याला उपचारार्थ मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.