बसला आग लागल्याची चाहूल लागताच प्रवाशांनी मारल्या खिडकीतून उड्या

0

बसला आग लागल्याची चाहूल लागताच प्रवाशांनी मारल्या खिडकीतून उड्या


प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता 

सिंदेवाही (वैनगंगा वार्ता न्यूज) राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या केबिनला अचानक आग लागल्याने, प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास सिंदेवाही जुन्या बस स्थानकावर घडली. Incident at Sindewahi आगीने रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच क्षणाचाही विलंब न करता आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.

ब्रह्मपुरी आगाराची चंद्रपूरकडे जाणारी एमएच 40 एक्यू 6068 क्रमांकाची बस सिंदेवाही येथील जुन्या जुना बस स्थानक परिसरात दुपाटी 2.30 वाजताच्या सुमारास थांबली. ब्रम्हपुरी आगार या बसमध्ये प्रवाशी खचाखच भरून होते. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या सर्वाधिक होती. बसमधील बॅटरीच्या वायरिंगने अचानक पेट घेतल्यामुळे केबिनला आग लागली. केबिनमधून आगीचा धूर निघाला होता. हे दृश्य बस स्थानकावर प्रवाशी व चालक वाहकांना दिसल्याने त्यांनी आरडाओरडा करून आतील प्रवाशांना सतर्क केले. लगेच पाण्याच्या बादल्या घेऊन आग विझविण्यास धाव घेतली. तोपर्यंत बसमधील प्रवाशांना याची काही कल्पना नव्हती. केबिनला आग लागल्याचे कळताच, आतील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने मागील खिडकीतून उड्या मारून बाहेर पडली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !