कृषी पंपाचे विद्यूत जनित्र बिघडल्याने धान पिकाची नुकसान

0
कृषी पंपाचे विद्यूत जनित्र बिघडल्याने  धान पिकाची नुकसान 

प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक

शेतकऱ्यांनी केला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात पळसगाव शेतशिवारातील बिघडलेल्या विद्युत जनित्रासमोर ठिय्या आंदोलन 

जोगीसारा-  तालुक्यातील पळसगाव शेतशिवारातील कृषी पंपाचे विद्युत रोहित्र गेल्या दोन  दिवसांपूर्वी गारपिट व चक्रिवादळाने  विद्यूत जनित्र बिघडल्याने  कृषी पंपाचा विद्युत पुरवठा थांबला आहे.  यामुळे उन्हाळी  गर्भात आलेल्या धान पिक पाण्या अभावी मोठं मोठ्या भेगापडुण पचेविस शेतकऱ्यांचे पिक वाळूण  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.यासंबधी वारंवार कृषी पंपाचा विघुत जनित्र बिघडल्याची माहिती देऊनही विज वितरण कंपनीच्या शाखा अभियंता यांना जाग आली नाही  कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात आज सकाळी पळसगाव शेतशिवारातील नादुरुस्त कृषी पंपाच्या जनित्रा समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले असता विज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता डोंगरवार यांना दुरध्वनी माहीती दिली असता तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले 

 आरमोरी तालुक्यातील पळसगाव शेतशिवारातील उन्हाळी धान पिक शेतकऱ्यांनी पहिलेच गाढवी नदीला इटियाडोह धरणाचे पाणी उशिरा आल्याने रोवण्या करण्यास विलंब होऊन बहुतेक शेतकऱ्यांचे धान उशिरा लागवड केली आणि आता पाण्याअभावी पिक हातून जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे  तेव्हा तात्काळ विध्यूत जनित्र दुरुस्ती करावे अशी मागणी केली आहे 
यावेळी शेतकरी सचिन मने संजय सेलोकर प्रविन ढोरे  राजु चौके दिनकर सेलोकर युवराज धोटरे मूखरु तितीरमारे राजु ढोरे प्रकाश सेलोकर देवनाथ झलके बाळकृष्ण नखाते सदानंद नखाते पराग सेलोकर फागुंन बगमारे राजु सेलोकर पितांबर ढोरे मनु चौके दिलीप चौके बाबुराव दुपारे भास्कर सेलोकर उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !