एक हात मदतीचा' मोहीम सुरू

0
'एक हात मदतीचा' मोहीम सुरू 


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

 गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून 'एक हात मदतीचा' या अभियानाचा शुभारंभ तहसीलच्या विहिरगाव ग्रामपंचायतीत करण्यात आला.
शुक्रवारी 17 डिसेंबर रोजी आधार मोहिमेची सुरुवात सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली.
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे, नागरिकांना मोफत आधार कार्ड, पॅनकार्ड, ई-लेबर कार्ड, हेल्थ कार्ड, मतदान कार्ड व शासकीय योजनांचा लाभ देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांनी ही माहिती दिली.
यावेळी विहिरगाव ग्रामपंचायत सरपंच ज्योतिका तलांडे, उपसरपंच अनिल कोठारे, ग्रामपंचायत सदस्य निखिल बारसागडे, जिजा सिडाम, चित्तलवार, कविता मोहुर्ले, पूनम मानकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !