मार्कंडा (कं) ग्रामपंचायत अपघात होण्याची वाट पहातेय काय ?
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं) येथील वॉर्ड क्रमांक 2 मधील जलवाहिनी फुटली होती. जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने हाती घेतले असून ज्या ज्या ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याकरिता खड्डे खोदण्यात आले. व काही ठिकाणी दुरुस्तीही करण्यात आली परंतु खड्डे बुजविण्याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.येथील जनतेला असा प्रश्न पडला की ग्रामपंचायत अपघात होण्याची वाट पहात आहे काय ?
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व नागरिकांना मुबलक पाणी मिळायला पाहिजे या हेतूने दुरुस्तीचे काम सुरू केले पण खोदकाम करून अंदाजे पंधरा दिवस होत आहेत. दुरुस्ती करणारा मिस्त्री गावातीलच आहे मग दुरुस्ती करुनही खड्डे दुरुस्ती होत नसल्याने ग्रामपंचायतच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. वॉर्ड क्रमांक 2 मधील बेघर वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर महेश ईजगीरवार यांच्या घराजवळ नळ जोडणीची जलवाहिनी फुटली होती यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता त्यामुळे दुरुस्ती करण्याकरिता खड्डा खोदण्यात आला हा खड्डा रस्त्यावर असल्याने या रस्त्यावरुन आवागमन करणाताना येथील ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे करीता तात्काळ दुरुस्त करून खड्डा बुजवावा अशी मागणी येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे

