नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांचा भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले स्वागत
क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी:-आज झालेल्या मतमोजणीत अहेरी तालुक्यातील वट्रा ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांचा माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
18 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 27 ग्रापंचायतीसाठी मतदान झाले.20 डिसेंबर रोजी मतमोजणी झाले असून अहेरी तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित पॅनलचे सरपंच आणि सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले. सरपंच म्हणून पुजा मुतन्ना पेंदाम यांचा विजय झाला.निकाल हाती लागताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अहेरी शहरात विजयी यात्रा काढली. फटाक्यांचा आतिषबाज करून जल्लोष करण्यात आला.यादरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे नागपूर विभागीय अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांनी सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले.
त्यानंतर निवडून आलेले सरपंच, सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा ताफा राजवाड्याकडे वळला. राजवाड्यात पोहोचताच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी सरपंच पूजा पेंदाम तसेच सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तसेच या निवडणुकीत अथक परिश्रम घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्यांचे ताईंनी आभार मानले व निवडून आलेल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.

