बल्लारशाह येथील ओव्हरब्रिजचा भाग कोसळला ८ गंभीर तर १२ जखमी

0
बल्लारशाह येथील ओव्हरब्रिजचा भाग कोसळला
८ गंभीर तर १२ जखमी


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावर रविवारी  ओव्हरब्रिजचा एक भाग कोसळला. या पुलाची उंची जवळपास 30 फूट उंच होती. अपघातावेळी अनेक प्रवाशी त्यावरून जात होते. पुलाचा स्लॅब कोसळताच प्रवाशी थेट रेल्वे रुळांवर कोसळले. या अपघातात 20 जण जखमी झालेत. त्यातील 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. ही घटना घडली तेव्हा काझीपेट-पुणे एक्सप्रेस पकडण्यासाठी अनेक प्रवाशी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर जात होते. अचानक पुलाच्या मध्यभागाचा स्लॅब कोसळला. यामुळे तेथून जाणारे प्रवाशी थेट रुळावर पडले.

 अलीकडेच म्हणजे १५ वर्षांपूर्वी हा पूल तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी आज सायंकाळी ५च्या सुमारास अचानक या पुलावर लोकांना ये-जा करण्यासाठी ज्या सिमेंटच्या पट्टया टाकल्या आहेत त्या खाली रुळावर प्लॅटफॉर्म क्रमांक २ जवळ कोसळल्या. त्यामुळे त्यावेळी पुलावर असलेले प्रवाशीही खाली कोसळले. या घटनेने रेल्वे स्थानकावर प्रचंड खळबळ उडाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत
जखमींची नावे 
साची निलेश पाटील, प्रेम तितरे (४५ वर्ष), चैतन्य मनोज भगत ( वय १८), निधी मनोज भगत, छाया मनोज भगत, नयन बाबाराव भिवनवार, राधेश्याम सिंग, अनुराग खरतड, रिया खरतड, स्विटी खरतड, विक्की जयंत भिमलवार, पूजा सोनटक्के (वय ३७), ओम सोनटक्के. यातील राधेश्याम सिंग यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !