चामोर्शी तहसीलदार यांचेवर कारवाई करा
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख व तालूका प्रमुख यांनी निवासी जिल्हाधिकारी शेंडगे यांना निवेदन देऊन केली मागणी
अशोक खंडारे आष्टी संपादक वैनगंगा वार्ता
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालूका चामोर्शी म्हणून ओळखले जाते या तालुक्यात अवैध वाळू, मुरुंम, विटा, व गिटृटी या गौनखनिजांची तस्करी होत आहे मात्र महसूल विभागाचे तलाठी , राजस्व निरीक्षक, नायब तहसीलदार व तहसीलदार हे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत.
तालुक्यातील आष्टी, येनापूर, कोनसरी, घोट व तालुक्यातील बहुतांश गावखेड्यात ही तस्करी खुलेआम सुरू आहे व मुख्य रस्त्यावर मोठमोठे रेतीचे ढिगारे दिसून येत आहेत तरीही महसूल विभागाचे अधिकारी या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.परंतू हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जाते आहे
शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्या जात आहे शासनाने चामोर्शी तालुक्यातील सर्वच रेतीघाट लिलाव करावे जेणेकरून शासनास महसूल प्राप्त होईल परंतु चार वर्षांपूर्वी पासुन ईल्लूर आष्टी व तालुक्यातील बरेच रेतीघाट लिलावापासून दूर आहेत त्यामुळे रेती तस्करी जोमात सुरू आहे यामुळे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यास जबाबदार आहेत.
चामोर्शी तालुक्यातील सर्वच रेतीघाट लिलाव करावे जेणेकरून शासनास महसूल प्राप्त होईल.
अवैध वाळू उपसा करुन ढिग टाकले गेले आहेत त्या ढिगांचे तात्काळ पंचनामे करून त्या लोकांवर शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी
आजच्या घडीला आष्टी परीसरात कुणाकडेही रेतीचा परवाना नाही परंतू तालुक्यातील गावात जर परवाना असेल तर त्यांना कारवाईतून सुट ध्यावी
जे रेती, मुरुंम, विटा, गिट्टी हे अवैधरित्या तस्करी करुन साठवून ठेवले आहेत ते शोधून ते कुनी टाकून ठेवले आहेत त्या तस्करांचा शोध घ्यावा व त्यांचा कुनी नाव सांगू शकत नसतिल तर ती रेतीची ढिगारे महसूल विभागाचे अधिकारी यांनी ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करावा
परंतू चामोर्शी तालुका तहसीलदार हे व त्यांचे सहकारी हे गाढ झोप घेत आहेत की झोपेचा सोंग घेत आहेत.
गडचिरोली शिवसेना जिल्हा पक्षप्रमुख (शिंदे गट) चे राकेश बेलसरे व चामोर्शी तालुका प्रमुख पप्पी पठाण यांनी निवासी जिल्हाधिकारी शेंडगे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे