डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरी येथे मानव विकास मिशन अंतर्गत मुलींना सायकलचे वाटप.
उपसंपादक // तेजल झाडे 9325801303
आरमोरी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय आरमोरी येथे दिनांक 18 /11/ 2022 रोज शुक्रवारला बाहेरगावावरून ये जा करणाऱ्या परंतु बस ची सोय नसणाऱ्या विद्यालयातील पात्र 22 मुलींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलीचे वितरण शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष मदनजी मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी त्यांनी विद्यार्थिनींना शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करावे व आत्मनिर्भर होऊन देश सेवा करावी असा मुलांना संदेश दिला
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व्ही जी शेंडे पर्यवेक्षक आर एम नैताम प्रसिद्धी प्रमुख बडोले व मेश्राम तसेच इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.