नारगुंडा पोलीस स्टेशन येथे जनजागरण मेळावा

0
नारगुंडा पोलीस स्टेशन येथे जनजागरण मेळावा

 30 आदिवासी गरीब महिलांना  गॅस-शेगडी चे वाटप


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता


       पोलीस  मदत  केंद्र नारगुंडा येथे दादालोरा खिडकीच्या माध्यमातून दिनांक 15/11/2022 रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्ताने व्हॉलीबॉल स्पर्धा,रेला नृत्य  स्पर्धा आयोजित तसेच उज्वला गॅस योजना अंतर्गत 30 महिला लाभार्थ्यांना गॅस  शेगडी  वाटप करण्यात आले
       सदर कार्यक्रमाचे उदघाटन नवनिर्वाचित महिला सरपंच कु. पूनम पदा यांनी केले. तसेच कार्यक्रमात  प्रमुख उपस्थिती ताडगाव येथील कमाला गॅस एजन्सी चे मालक  श्रीकांत हेडो यांची लाभली. 
    सदर स्पर्धेची सुरूवात भगवान बिरसा मुंडा  यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन  व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. तसेच प्रभारी अधिकारी मयूर पवार यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्या नंतर उज्वला गॅस  योजना अंतर्गत 31 महिला  लाभार्थ्यांना फक्त 100 रुपयात गॅस शेगडी चे वाटप करण्यात आले.त्या वेळेस उपस्थित  सर्व  नागरिकांनी नारगुंडा पोलिसांचे कामाचे कौतुक केले. 
       सदर व्हॉलीबॉल ,रेला नृत्य स्पर्धेकरिता अतिदुर्गम भागातील  खंडी, कुचेर, halver, नारगुंडा, कोळपे, pokur,कियर,  नैनवाडी,इत्यादी गावातील एकूण 14 व्हॉलीबॉल संघांनी. तर रेला नृत्य स्पर्धामध्ये 5 संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमास 220 ते 230 खेळाडू,महिला, शाळकरी  मुल गावकरी उपस्थित होते. प्रत्येक संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्या मधून प्रथम क्रं. Halver संघ, द्वितीय क्रं. नारगुंडा  संघ  व तृतीय क्रं. खंडी  या संघानी पटकाविले. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रं. विजेत्या संघांना अनुक्रमे 3000/- रू,2000/- रू व 1000/-  रू. रोख पारितोषिक व  प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 
          तसेच  उपस्थित खेळाडूंना विभागीय स्तरावर आयोजित होणाऱ्या इतर स्पर्धांबाबत  मार्गदर्शन करून त्याचा उपयोग शासकीय नोकरभरतीत कसा होतो याबाबत माहिती देण्यात आली. सदर शिबीर यशस्वी होण्याकरिता प्रभारी अधिकारी मयूर पवार, पोउपनि माधव लोणकर, पोउपनि सतीश बेले, पोउपनि बाबू  कस्तुरे  तसेच जिल्हा पोलिस व SRPF च्या अमलदारांनी संघभावनेने परिश्रम घेतले. सदर स्पर्धेत उपस्थित नागरिकांची व खेळाडूंची भोजनाची व्यवस्था करून स्पर्धेची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !