तहसीलदार स्वप्निल रावडे विरुद्धार्थी फौजदारी गुन्हा दाखल करा
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
मंगळवेढा
कर्तव्यात कसूर करून आंदोलनकर्त्यांना वेठीस धरणारे स्वप्नील रावडे तहसीलदार मंगळवेढा याचे विरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या कडे निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष अशोक रणदिवे ,जिल्हा महिला अध्यक्ष वैशाली चंदनशिवे, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वैद्यकीय सेल चे उपजिल्हा प्रमुख संजय गेजगे, शब्बीर सय्यद, आदी उपस्थित होते.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मौजे शेलेवाडी येथील दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी मयत असून त्यांचे पश्चात पत्नी सुनीता, मुलगा तुकाराम व सुखदेव तसेच मुलगी विमल असे चौघेजण कायदेशीर वारसदार असताना महाराष्ट्र सरकारचा महसूल बुडविण्याकरिता सुनीता डांगे हिने दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी तिची मुलगी विमल सत्यवान खडतरे हिच्याशी संगनमत करून महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली असल्याने त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या करिता अ. भा. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर 2022 पासून मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. तसेच ऍड. व्ही. के. वसगडेकर विधिअधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी कळविले आहे तथापी सदर प्रकरणी तहसीलदार स्वप्निल रावडे हे *more interested* असल्याने खोटे प्रतिज्ञापत्र तयार करणारी सुनीता डांगे व तिला सहकार्य करणाऱ्या विमल खडतरे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविणे कामी जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केली असून आंदोलनकर्त्यांना वेठीस धरले आहे . त्यामुळे रावडे यांचे विरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवावा. अशी मागणी केली असून जो पर्यंत सुनीता डांगे, विमल खडतरे व तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला जात नाही तो पर्यंत मंगळवेढा प्रांत कार्यालया समोर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन सुरू च राहिल अशी भूमिका अ. भा.रिपब्लिकन पक्षाने घेतली आहे.