मार्कंडा (कं) येथे बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
मार्कंडा (कं) येथे बिरसा मुंडा जंयती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली पाणी जंगल आणि भुमी साठीची लढाई शतके जुनी आहे या लढाई शेकडो नायक आले आणी गेले परंतु हा लढा आजही कायम आहे आज आम्ही असा मोहक नेत्या बदल बोलत आहे ज्याच्या एका आदेशावर शेकडो लोक जमले आणी त्यानी इंग्रजाना खाली गुडघे टेकायला भाग पाडले व इंग्रजावर वार केले आज आपण बोलत आहे आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा ते आदिवासी नेते व लोक नायक होते त्याचा पुर्ण नाव बिरसा सुगान मुंडा होते त्याच्या जन्म १५ नोव्हेंबर १८७५/ मध्ये झारखंड मधील कुटी जिल्ह्यातील उलिहातु रांची येथे झाला त्याच्या आई नाव करमी हतु होते त्याचा मुत्यु१९०० मध्ये झाला १९ शतकांतील बिरसा मुंडा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे लोक नेते म्हणून उदयास आले आदिवासींना लाभलेला त्याच्या भुमि युध्दाचा वारसा शतकानुशतके प्राचीन आहे मुंडा आदिवासींच्या नेतृत्वात १९ व्या शतकातील नायक बिरसा मुंडा यानी महान असी एक चळवळ उभी केली या चळवळीलाच उलगुलान असे म्हणतात असा या थोर महान भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मार्कंडा कं येथे साजरी करण्यात आली जयंती निमित्त प्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ता संजयराव पंदिलवार यांनी पुष्प हार अर्पण करून दिप व धुप प्रज्वलीत केले या प्रसंगी मंचावर गावातील प्रतिष्ठित नागरिक शंभर तोरे, रावजी वेलादी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश आत्राम, साईनाथ वेलादी, विजय तोरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पेंदाम शिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर तोरे शिक्षक यांनी मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद शेडमाके, अतुल सिडाम, अर्चनाताई बंडु परचाके, अर्चनाताई मडावी, महेश कनाके, आत्माराम कुसनाके यांनी अथिक परिश्रम घेतले सदर कार्यक्रमात गावातील सर्व आदिवासी बांधव महिला भगिनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली