फुले महाविद्यालयात महात्मा फुले स्मृतिदिन साजरा

0
फुले महाविद्यालयात महात्मा फुले स्मृतिदिन साजरा


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता 

आष्टी- वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.संजय फुलझेले होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजकुमार मुसने, डॉ. भारत पांडे, डॉ. गणेश खुणे, प्रा. रवी गजभिये ,प्रा. ज्योती बोबाटे, प्रा. नासिका गभणे उपस्थित होते. प्रा. डॉ.राजकुमार मुसणे यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत महात्मा फुले यांचे कार्य व विचार विज्ञानवादी व प्रयत्नवादी  आहे, हे सोदाहरण स्पष्ट केले .महात्मा फुले यांच्या साहित्य कृतींचाही परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. संजय फुलझेले यांनी बहुजनांच्या मानसिक स्वतंत्र्यासाठी महात्मा फुले यांनी केलेल्या कार्याचा आढावा  घेतला. कार्यक्रमाचे संचालन पायल पुल्लीवार हिने प्रास्ताविक आचल मडावी हिने तर उपस्थितांचे  आभार प्रा. ज्योती बोबाटे यांनी मांनले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !