वाघाने केली गोह्याची शिकार भाडभिडी (बी.) वनपरिक्षेत्रातील घटना
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता
चामोर्शी, (वा.). भाडभिडी (बी.) वनपरिक्षेत्र येणाऱ्या जंगला परिसरात वाघाने गोऱ्याची शिकार केल्याची घटना 16 नोव्हेंबर रोजी घडली. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, रेखेगाव येथील साईनाथ पिपरे हे आपल्या बैलांना चराईसाठी कक्ष क्रमांक 826 मध्ये घेवून गेले होते. दरम्यान, झुडूपात दबा धरून बसलेल्या वाघाने पिपरे यांच्या गोऱ्यावर हल्ला करुन ठार केले.
यामुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. इनवाते, क्षेत्र सहाय्यक व्ही. एस. चांदेकर, वनरक्षक व्ही. जी. आहेत.
लांजेवार, वाहन चालक दिलीप संपर्क दूधबावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन सहन पंचनामा केला. पुढील तपास क्षेत्र ग्राम सहाय्यक व्ही. एस. चांदेकर करीत
आहेत.