धक्कादायक..! पतीचा खून करणाऱ्या पत्नीचा मुलीनेच केला पर्दाफाश...
उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता
चंद्रपूर वैनगंगा वार्ता
वडिलांच्या मृत्यूनंतर आईच्या मोबाईलमधील ऑडिओ क्लिप ऐकून मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली, थेट गाठलं पोलीस स्टेशन अन्...
पतीची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तीन महिन्यांनी पत्नीला अटक केली आहे. चंद्रपूरमधील या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. महिलेने हृदयविकाराचा झटका आल्याने पतीचा मृत्यू झाल्याचं आपल्या मुलीसह सर्व नातेवाईकांना सांगितलं होतं. पण तीन महिन्यांनी मुलीला आईच्या मोबाईलमध्ये ऑडिओ क्लिप सापडली. यामध्ये महिलेने प्रियकराशी बोलताना आपला गुन्हा कबूल केला होता.
रंजना रामटेके या महिलेने निवृत्त सरकारी
अधिकारी असणाऱ्या आपल्या पतीची ६ ऑगस्टला खून केला होता. खून केल्यानंतर तिने आपल्या प्रियकराला फोन करुन हत्येची माहिती दिली होती. हा सगळा संवाद मोबाइलमध्ये रेकॉर्ड झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. “मी उशीच्या सहाय्याने त्यांचा खून केला आहे. मी आता सकाळी नातेवाईकांना फोन करुन मृत्यू
झाल्याची माहिती देईल. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगणार आहे." असं महिला सांगत असल्याचं रेकॉर्ड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसऱ्या दिवशी महिलेने ठरल्याप्रमाणे नातेवाईकांना फोन करुन खोटी बतावणी केली.
कोणालाही संशय न आल्याने मृतदेहावर
अंत्यसंस्कार करण्यात आले असं पोलिसांनी
सांगितलं आहे.
सर्व काही रंजना यांनी ठरवल्याप्रमाणे झालं होतं.
पण तीन महिन्यांनी मुलगी सेता भेटायला आली आणि सगळं गुपित उघड झालं. श्वेताने फोन करण्यासाठी आईचा मोबाइल घेतला असता त्यात तिला ऑडिओ क्लिप सापडली आणि धक्काच बसला. यानंतर तिने पोलिसांना याबाबत माहिती दिली. “श्वेता पोलीस ठाण्यात आली आणि ऑडिओ
रेकॉर्डिंग ऐकवली. रंजना आणि त्यांचा प्रियकर मुकेश त्रिवेदी यांच्यात हे संभाषण झालं होतं. आपण कशाप्रकारे खून केला आणि खोटी बतावणी करणार आहोत याबद्दल त्या बोलताना ऐकू येत आहे," असं पोलिसांनी सांगितलं आहे. ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावलं. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे.