माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते सभा मंडपाचे उदघाटन
क्रिष्णा गावडे तालुका प्रतिनिधी.
सिरोंचा:-तालुक्यातील व्येंकटापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ग्लासफोर्डपेठा येथील सभा मंडपाचे उदघाटन माजी अध्यक्ष जि प गडचिरोली भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी अरवेली, माजी प स सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समय्या कुळमेथे,ग्रा प सदस्य रवींद्र कार्सपल्ली,ग्रा प सदस्य शेपाली गड्डी, ग्रा प सदस्य शंकर गड्डी,संजीवकुमार मेडी, तिरुपती बोगडामिदी, अमृता तलांडी, पोचम कुमरम,सुरेश मोहरला आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्लासफोर्डपेठा येथील नागरिकांनी आ धर्मराव बाबा आत्राम तथा भाग्यश्रीताई आत्राम यांच्याकडे गावात सभा मंडप देण्याची मागणी केली होती.गावातील नागरिकांची अडचण लक्षात घेऊन 25/15 इतर ग्रामविकास कार्यक्रम या लेखाशीर्ष अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आले.
नुकतेच गावात सुसज्ज सभा मंडपाचे काम पूर्ण झाले असून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.दिलेलं शब्द पूर्ण केल्याने गावकऱ्यांनी भाग्यश्री ताई आत्राम यांचे आभार मानले.

