मेडीगट्टा प्रकल्पग्रस्तांचे साखळी उपोषण व धरणे आंदोलन
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
मेडीगट्टा प्रकल्पग्रस्तांचे साखळी उपोषण व धरणे आंदोलन सिरोंचा येथे सुरू आहे.
दि.७ नोव्हेंबर पासून मेडीगट्टा धरणासाठी शेतकऱ्यांची शेती धरणाखाली गेली मात्र त्या जमिनीचे सर्वेक्षण व भूसंपादन करण्यात आले नाही व ही शेत जमीन नदीच्या पुरामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाली शेतात कोणतेही पीक नाही त्यामुळे या शेतकऱ्यांची अपरिमित हानी झाली आहे जी गावे या धरणामध्ये गेली आहेत त्या गावांना पूरबाधीत घोषित करून सर्वे करून भूसंपादन करावे आणि योग्य मोबदला देण्यात यावा या आंदोलनाचा आज सातवा दिवस असूनही या बाबीकडे शासन लक्ष देत नाही असे दिसते आहे
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्क द्यावा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे

