विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी ईल्लूर येथील एका तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज दी.१४ नोव्हेंबर ला सकाळी सात वाजता चे दरम्यान घडली
मृतक तरुणीचे नाव सुप्रिया सुभाष कुबळे वय १६ वर्षे रा.ईल्लूर असे आहे सदर तरुणी सकाळी पाणी आणण्यासाठी अशोक पातर यांच्या घराजवळ असलेली शासकीय विहीवर गेली होती ती पाणी काढत असतांना विहिरीत कोसळली तेव्हा विहीरी जवळ असलेल्या लोकांना आवाज आल्याने त्याठिकाणी धाव घेऊन त्या तरुणीला वाचविण्यासाठी प्रयत्न केला मात्र प्रयत्न करुनही यश आले नाही शेवटी तीचा मृतदेह बाहेर काढावे लागले
घटनेची माहिती आष्टी पोलीस स्टेशन ला देण्यात आली लागलीच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पाठविण्यात आला . शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधीक तपास पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले व कर्मचारी करीत आहेत.

