मुर्लीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर हरणघाट येथिल पालखीचे आष्टी येथे आगमन

0
मुर्लीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर हरणघाट येथिल पालखीचे आष्टी येथे आगमन


माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रुपालीताई व संजय पंदिलवार यांनी केले पालखीचे स्वागत


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता 
 

श्री मुरलीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान हरणघाट पारडी यांचा पालखी सोहळा चामोर्शी तालुक्यातील कढोली येथुन चपराळा हनुमान मंदिर देवस्थान संस्थानाचे अध्यक्ष संजयराव पंदिलवार यांच्या आष्टी येथील राहत्या घरी आगमन झाले या पालखीचे आगमन होताच माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रुपालीताई संजय पंदिलवार यांनी या पालखीचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले व प.पु.मुरलीधर महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला व आरती करण्यात आली
    त्यानंतर पालखी समवेत असलेल्या  भक्तांना व मुरलीधर महाराज यांनी अल्पोपहार करून  संजयभाऊ पंदिलवार यांच्या राहत्या घरी थोड्या वेळ विश्रांती करून हि पालखी आष्टी शहरात फिरून चपराळा येथील हनुमान मंदिर देवस्थान येथील पावन भूमीत प्रस्थान केले
या पालखी सोहळ्यात शेकडो भाविक उपस्थित होते.
पंदिलवार यांच्या घरी हि पालखी आल्याने शांततामय वातावरण दिसून येत होते सदर पालखी सोहळा पंदिलवार यांच्या घरी आगमन होताच दर्शनासाठी आष्टी शहरातील भाविकांची मोठी गर्दी केली होती यावेळी
रामचंद्र पा बामणकार, राजुभाऊ चंदने, विनोद येलमुले, पंकज येलमुले, माजी सरपंच कमलाबाई बामणवाडे, आनंद कांबळे, नाना पसपुलवार, संजय पोटे, प्रामुख्याने उपस्थित होते.
 सदर पालकी संजय पंदिलवार याच्या घरी आल्यावर त्यांचे स्वागत आणि अल्पोपहार चे नियोजन रमेश चुनारकर व आनंद वर्धलवार यांनी योग्य रीतीने सांभाळीले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !