आष्टी अप्पर तालुक्याच्या मागणीला मिळाली गती

0

आष्टी अप्पर तालुक्याच्या मागणीला मिळाली गती


महसूलमंत्र्यांकडून सकारात्मक आश्वासन; संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची नागपुरात भेट


आष्टी | प्रतिनिधी

आष्टी येथे अप्पर तालुका निर्माण करण्याच्या मागणीसंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या मागणीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक माहिती तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

आष्टी तालुका संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने ५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील रविभवनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, माजी आमदार सुधाकर कोहळे आणि माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आष्टी येथे अप्पर तालुका निर्माण करण्याची मागणी मांडली.

यावेळी अप्पर तालुका निर्मितीसंदर्भातील शासनाच्या परिपत्रकात आष्टीचा समावेश नसल्याची बाब शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. आष्टी परिसरात उपलब्ध असलेल्या प्रशासकीय सुविधांची तसेच भौगोलिक परिस्थितीची माहिती देत अप्पर तालुका निर्मितीसाठी आष्टीचा विचार करण्याची मागणी करण्यात आली.

आष्टी येथे दोन महसूल मंडळे, तलाठी साजे आणि ग्रामीण रुग्णालय उपलब्ध असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. परिसरातील नागरिकांना महसूल व प्रशासकीय कामांसाठी होणारी गैरसोय कमी व्हावी आणि स्थानिक पातळीवर प्रशासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने आष्टीला अप्पर तालुक्याचा दर्जा देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी मांडले.

शिष्टमंडळाने मांडलेल्या मागणीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आष्टी येथे अप्पर तालुका निर्माण करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच यासंदर्भातील आवश्यक माहिती तत्काळ सादर करण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.

या भेटीमुळे आष्टी अप्पर तालुका निर्मितीच्या मागणीबाबत पुढील प्रशासकीय कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाकडून यासंदर्भात पुढील निर्णय होणे बाकी आहे.

या शिष्टमंडळात तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद कोलेट्टीवार, सचिव दिलीप बारसागडे, संजय पंदीलवार, व्यंकटी बुर्ले, दिवाकर कुंदोजवार, शंकर आक्रेड्डीवार, विजय बहिरेवार, शंकर मारशेट्टीवार, राजनाथ कुशवा, अनिल आलुरवार, बेबी बुरांडे, भारती रायसिडाम, नंदा कुळसंगे, इंदिरा चिताडे, सुमन मस्के, किशोर कुरवटकर, भगवान थोटे, दामोधर ब्राह्मणवाडे, सेवानिवृत्त प्राचार्य दीपक रॉय, हरिदास मेश्राम, रामचंद्र बामनकर, आचेवार, विलास बोलगोडवार, ओमप्रकाश इचेड, डॉ. भारत पांडे, नाशिकांत भसारकर, विजय जोरगलवार, बंडू चापले, प्रणय बुर्ले, आयुष पंदीलवार, रविंद्र नामेवार, देवा बनकर, मल्ला अम्मावार, संदीप तिवाडे, कैलास दुर्गे, विनोद दुर्गे, तुळशीमरा डायेले, सुनील चहारे, मोहनदास चहारे, ढेकलू निमसरकार, रमेश झाडे, अनिल आलमवार व विनोद येलमुले यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !