दहा रुपयांसाठी जीव धोक्यात; ई-पिक पाहणी करणाऱ्या युवकांची व्यथा

0

दहा रुपयांसाठी जीव धोक्यात; ई-पिक पाहणी करणाऱ्या युवकांची व्यथा!

साप-विंचवांचा धोका, शेतकरी बांधावर जात नाहीत ; अल्प मोबदल्यात ई-पिक पाहणीचे काम करायचे कसे?



गडचिरोली : जिल्ह्यातील काही गावातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी ऑनलाइन करण्याचे काम सुलभ व्हावे, या उद्देशाने युवकांची ई-पिक पाहणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, प्रती सातबारा अवघे १० रुपये मिळत असल्याने हे काम परवडणारे नसल्याची भावना संबंधित युवकांमध्ये व्यक्त होत आहे.
ई-पिक पाहणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या युवकांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून ती ऑनलाइन नोंदवावी लागते. अनेक शेतजमिनी दुर्गम भागात असून शेताच्या बांधावर जाताना साप, विंचू तसेच इतर जंगली प्राण्यांचा( वाघ, बिबट, अस्वल, हत्ती) धोका कायम असतो. अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करावे लागत असताना प्रती सातबारा केवळ दहा रुपये मोबदला मिळत असल्याने हा मोबदला अत्यंत तुटपुंजा असल्याचे युवकांचे म्हणणे आहे.
 गावात शेतकऱ्यांनाचे त्या तरुणांना कुणाची शेती कोनती आहे हेच माहीत नाही तरी शेतकरी बांधावर जाऊन आपली शेती ही म्हणून दाखवली जात नाही माहिती नसल्याने युवकांची कोंडी होत आहे 
ई-पिक पाहणी करताना आणखी एक गंभीर अडचण निर्माण होत आहे. काही शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या अचूक बांधाची अथवा हद्दीची माहिती नसते. अनेक वेळा संबंधित शेतकरी स्वतः शेताच्या बांधावर येण्यास तयार नसतात किंवा त्यांना शेताची नेमकी हद्द दाखवता येत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या शेताची पाहणी करून ऑनलाइन नोंद नेमकी कशी करायची? असा प्रश्न युवकांसमोर उभा ठाकला आहे.
मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन ई-पिक पाहणी करताना प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकाची स्थिती, क्षेत्र आणि इतर आवश्यक माहिती नोंदवावी लागते. त्यामुळे केवळ मोबाईल हातात घेऊन हे काम पूर्ण होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष शेतात जावे लागते आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

दहा रुपयांत रोजगार की जीवघेणे काम?

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ई-पिक पाहणीचे काम देण्यात आले असले, तरी प्रती शेतकरी १० रुपयांचा मोबदला आणि त्यासाठी करावा लागणारा वेळ, प्रवास व जोखीम पाहता हे काम आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे युवक सांगत आहेत.
एकीकडे शासन शेतकऱ्यांच्या पिकांची अचूक ऑनलाइन नोंद व्हावी यासाठी ई-पिक पाहणीवर भर देत आहे, तर दुसरीकडे हे काम करणाऱ्या युवकांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
ई-पिक पाहणी करणाऱ्या युवकांचा मोबदला वाढवावा, प्रत्यक्ष शेतावर जाण्यासाठी येणारा खर्च लक्षात घ्यावा, तसेच शेताच्या हद्दीबाबत शेतकऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी संबंधित युवकांकडून होत आहे. त्या युवकाना शासनाने मोबदला योग्य स्वरूपात देण्यात यावा व त्यांना सुरक्षा कवच प्रदान करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !