गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा;
अखिल भारतीय किसान सभेची मागणी ,
जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन
गडचिरोली:-
एल निनोजा प्रभाव असल्याने संबंध महाराष्ट्रभर तीव्र दुष्काळाचे सावट पसरले आहे. धान, सोयाबीन, कापूस व खरिपाची सर्व पिक उध्वस्त झाली आहेत.
अखिल भारतीय किसान सभा ने दिनांक 23/9/2826 राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. गडचिरोली जिल्हा किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, प्रति हेक्टर 50 हजार मदत देण्यात यावे, नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, जाहिर केलेले बोनस त्वरित देण्यात यावे, शेतमालाला उत्पादन खर्च च्या दिंड पट भाव देण्यात यावे, वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, वाघ व हत्ती च्या हल्लात मृत्यू झालेल्या व्यक्तीना 50 लाख रुपये मदत देण्यात यावे, शेतकरी, शेतमजूर, कामगार याना 5 हजार रुपये पेन्शन देण्यात यावे ई मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब यांना पाठविण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड अमोल मारकवार, कॉम्रेड नाशिर हासमी, रुषी प्रधान, परसराम आदे, राजु मडावी , ताज कुरेशी,हरिदास मोगरकर,राजु सातपुते, संदीप शेंन्डे, ईंत्यादिने केले
तर आझाद समाज पक्षाचे राज बन्सोड व विनोद मडावी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

