माता - बाल मृत्यू प्रकरणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांची रुग्णालयांवर धडक

0

माता - बाल मृत्यू प्रकरणी रिपब्लिकन कार्यकर्त्यांची रुग्णालयांवर धडक


गडचिरोली-- गडचिरोली जिल्ह्यात वारंवार होत असलेल्या माता व नवजात बालकांच्या मृत्युमुळे नागरिकांमध्ये असुरक्षेचे वातावरण पसरले असून हे मृत्यू थांबविण्यासाठी आरोग्य प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वात आज दुपारी पक्षाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अतिरिक्त शल्य चिकित्स डॉ. छाया उईके व महिला व बाल रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांची प्रत्यक्ष भेट घेवून याबाबतचे लेखी निवेदन सादर केले व या गंभीर विषयावर सविस्तर चर्चा केला.
गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रूग्णालयात अलीकडील काळात माता व नवजात शिशुंच्या मृत्यूच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, ही बाब जिल्हावासीयांसाठी अतीशय गंभीर व चिंतची आहे. याकडे पक्षाने अधिकाÚयांचे लक्ष वेधले.
संबंधीत गरोदर मातांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने सदरचे मृत्यू झाल्याचे या मातांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. स्त्री-रोग तज्ज्ञ व संबंधीत कर्मचाÚयांनी सदर रूग्णांना योग्य उपचार वेळेवर न दिल्याने हा सर्व दुःखद तसेच संतापजनक प्रकार घडलेला असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
तरी अशाप्रकारचे मृत्यू होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्यात यावी. या मृत्यूंसाठी जबाबदार असणाÚया डॉक्टर व कर्मचाÚयांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी किमान 1 कोटी रूपयांची शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी सुध्दा यावेळी करण्यात आली.
शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, महिला आघाडीच्या नेत्या सुरेखाताई बारसागडे, सुनिता रायपुरे, विधानसभा प्रभारी प्रदीप भैसारे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव वासनिक, विजय देवतळे, दादाजी धाकडे, विठोबा साखरे, लालबहादूर मशाखेत्री, मधूकर टेंभुर्णे, अरूण भैसारे, नामदेव दुधे व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !